मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
मुंबई : कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढणार असून प्रतिबंधाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. पुन्हा एकदा संसर्गात वाढ झाली तर लॉकडाऊन सारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे जनतेला निर्धाराने नियम पाळावे लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नव्या विषाणूची घातकता लक्षात घेता सर्व जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता आवश्यक निर्णय घेत पावले टाकावीत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
0 टिप्पण्या