बलात्कार करून महिलेची हत्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

बलात्कार करून महिलेची हत्या

बारा दिवसांत फरार आरोपीला अटक 

मुंबई : घाटकोपरचं पंतनगर परिसरात महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सागर यादव या तरुणाला अटक केली. २ नोव्हेंबर रोजी पंतनगरमध्ये एका महिलेचा हात-पाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह सापडला होता. 

पंतनगर परिसरात २ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. महिलेला विवस्त्र करून त्याची हत्या करण्यात आली होती. 

पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. गुन्हे शाखा युनिट ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंद येरेकर, सुशांत बडगर, अर्चना पाटील, संजय  जगताप, जयदीप जाधव, अमोल माळी, लक्ष्मण लडके यांच्या पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी येताना- जातानाचे सर्व मार्ग व लहान गल्ल्यांमधील खासगी दुकाने आणि आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज यांची बारकाईने पाहणी करून आरोपीचे स्पष्ट चित्र प्राप्त करण्यात आले. 

फुटेजची पाहणी करत असताना संशयित आरोपी नवी मुंबई तसेच पंतनगर, घाटकोपर,  कुर्ला, सायन, माटुंगा, माहीम, बीकेसी या ठिकाणी फुटपाथवरून जात असल्याचे दिसून येत होते. त्या अनुषंगाने या परिसरात सापळा लावण्यात आला होता. 

पोलीस पथके डोळ्यात तेल घालून दिवस रात्र आरोपीच्या मागावर असताना आरोपी मानखुर्द परिसरात आला असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून शनिवारी त्याला अटक केली. 



















प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज