सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : तक्रारदार धर्मेंद्र विनोद गाला, (वय ३४ वर्ष) रा.ठि. चिंचबंदर, मुंबई हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी २०.१३ वाजता परेल रेल्वे स्टेशन येथून सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे येण्यासाठी अप लोकल सीएसएमटी बाजूकडील तिसऱ्या जनरल डब्यामध्ये बसून प्रवास करताना ती गाडी भायखळा रेल्वे स्टेशन येथे फलाट क्र. २ वर २०.४३ वाजता आल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तक्रारदार यांच्या गळ्यातील ६०,०००/- रू. किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरीने खेचून चोरून पळून गेल्याबाबत तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं. ४२०/२०२१ कलम ३९२ भा.दं.वि.सं अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्यातील अनोळखी इसमाचा तपास करीत असताना तपासादरम्यान गुन्ह्याचे घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने खास गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी नामे तारू मोहम्मद अली शेख, (वय ३३ वर्षे) रा.ठि. आनंदनगर, खडवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने कबुली दिली की, पंचनाम्याप्रमाणे त्याच्या राहत्या घरातून ६०,०००/- रू. किं. ची १९.३७० मिली ग्रॅम सोन्याची चैन पंचांसमक्ष काढून दिल्याने सदर गुन्ह्याचे तपास व पुरावे कामी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे सपोनि श्री. रूपवते, पोहवा/१०० घोडके, पो हवा/३४१७ देसले, पोहवा/२९४ मोहिते, पोना/४०२ इंगवले, पोना/४४२ टकले, पोशि/१२४६ पाटील, पो शि/१५२६ चव्हाण यांनी केलेली आहे. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली आहे.
Press Note

0 टिप्पण्या