Ticker

6/recent/ticker-posts

महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या टकाटक स्टारला अटक

मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांकडे केले स्वाधीन

मुंबई, दादासाहेब येंधे : टकटक ॲपवर महिलांशी मैत्री करून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करणे, असे न केल्यास ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाला शनिवारी कुर्ला मनसे कार्यकर्त्यांनी त्यांनी चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

या ॲपवर टाकाटक स्टार अमोल या नावाने प्रोफाइल असलेल्या अमोल दीप ( वय ४०, राहणार खारघर, नवी मुंबई) या तरुणाने याच ॲपवर चांदोली येथील एका विवाहित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर त्याने या महिलेला काही अश्लील व्हिडिओ पाठवून तो तिच्याशी अश्लील बोलू लागला.

तो सर्व महिलांचे स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओदेखील बनवत होता. त्यानंतर त्याने या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच तिला तो रेकॉर्ड केलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. या महिलेने अधिक माहिती घेतली असता त्याने अनेक महिलांसोबत असेच वर्तन केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी चांदीवली येथील मनसेच्या पदाधिकारी प्रियंका निंबाळकर आणि मनसे कामगार सेनेच्या राज पार्टे, विजय निकम यांच्याकडे मदत मागितली. या पदाधिकाऱ्यांनी या महिलेच्या मदतीने ट्रॅप लावून अमरदीपला कुर्ल्यात बोलावून घेतले. तो तेथे येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्याला साकीनाका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. साकीनाका पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या