कोरोना प्रतिबंधक नियम पाळणं गरजेचे
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उद्या ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले की सिद्धिविनायक मंदिर ॲप वर क्यूआरकोड प्री बुकिंग करणं अनिवार्य असेल. दर्शनासाठी २५० भाविकांना दर तासाला क्यू आर कोड दिले जातील. तसेच भाविकांना मंदिरात मास्क वापरणं, शारीरिक अंतराचे नियम पाळणे अशा कोविड प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करावं लागेल.


0 टिप्पण्या