Ticker

6/recent/ticker-posts

डुप्लिकेट नंबरप्लेट बनवून दुचाकींची चोरी

मुंबई, दादासाहेब येंधे : दुचाकी चोरून त्या नकली नंबर प्लेट वापरून कमी किंमतीमध्ये विकणाऱ्या किशोर शांताराम शिर्के (वय ४३) या मेकॅनिकला भांडुप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. भांडुपच्या साई हिल परिसरात राहणारा किशोर शेळके हा मेकॅनिक गेल्या दीड महिन्यापासून निर्जन स्थळावर पार केलेल्या दुचाकी हेरायचा. हँडल लॉक नसलेल्या दुचाकी डुप्लिकेट चावी वापरून त्या चोरी करत असे.  २१ सप्टेंबरला भांडुपच्या कोकण नगर परिसरातील एक गाडी चोरताना तो सीसीटीवी फुटेजमध्ये कैद झाला होता. गाडी मालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदाराच्या मदतीने किशोरला अटक केली. त्याच्याकडून भांडुप तसेच मुलुंड परिसरातून चोरी केलेल्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या