Ticker

6/recent/ticker-posts

काळबादेवीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू

रविवारीच रहिवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी नाही

मुंबई : काळबादेवी येथे इमारत कोसळून रविवारी एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी इमारतीचा काही भाग कोसळल्याने ती रिकामी केली होती. मात्र, रात्री इमारत पूर्ण कोसळली. तेव्हा इमारतीखाली मोबाईलवर बोलत असलेले सुंदरा साव (वय ६१) ढिगाऱ्याखाली अडकले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना संध्याकाळीच इमारती बाहेर काढले होते.

काळबादेवी येथील खंडेराववाडीतील पाचव्या क्रमांकाच्या चार मजली इमारतीचा काही भाग रविवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास कोसळला. त्यानंतर ही इमारत अग्निशामक दलाने रिकामी केली होती. ही म्हाडाची इमारत असून यात प्रामुख्याने सोन्याचे दागिने बनविणारे कारखाने होते. १०० कामगारांसह इतर रहिवाशांना संध्याकाळीच इमारती बाहेर काढले होते. तसेच म्हाडाच्या पथकाने इमारतीचे प्रवेशद्वारही सील केले होते. अखेर साडेदहाच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली असून सुदैवाने इमारत रिकामी केल्यामुळे फारशी जीवितहानी झाली नाही. पण, त्यावेळी इमारतीच्या खाली उभे असलेले सुंदर साव ढिगाऱ्याखाली अडकले; त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जे जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती देण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या