पेट्रोल पंपावर डेबिट कार्डवरून लाखोंची अफरातफर
मुंबई, दादासाहेब येंधे : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना वापरलेल्या एटीएमची माहिती पीओएस मशीनद्वारे चोरी करून नवीन कार्डच्या माध्यमातून बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या एका टोळीचा मोहीम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या रोहित अमरनाथ मिश्रा या ३० वर्षांच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी डाटा स्कॅनिंग मशीन जप्त केली आहे. याच मशीनमधून त्याने एका वयोवृद्धाच्या एटीएमची माहिती चोरी करून नवीन कार्ड द्वारे त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांचा अपहार केला होता. त्याच्या अटकेने फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्टॅनिस्लिम पिट तावडिया हे ६१ वर्षांच्या वयोवृद्ध पत्नीसोबत माहीमच्या मारीनगर परिसरात राहतात. १ जूनला त्यांनी त्यांचा मोबाइल दुरुस्त करून चालू करताच त्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज आलेले दिसले. २१ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत त्यांच्या डेबिट कार्डद्वारे बँक खात्यातून पावणेदोन लाख रुपये ट्रान्सफर झालेले दिसले. डेबिट कार्ड स्वतःकडे असताना असे कसे झाले म्हणून त्यांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार केली. आपले डेबिट कार्ड त्यांनी शेवटचे माहीम येथील सेनापती बापट मार्गावरील सरस्वती शाळेजवळील सोवोरीअन सर्विस स्टेशन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना वापरले होते. अशीच आणखी एक तक्रार वकील मिलींद मधुकर मालवणकर यांनीही पोलिसांत केली होती. त्यांनीही याच पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरले होते. त्यानंतर त्यांनी कुठेही कार्ड वापरले नसताना त्यांच्या खात्यातून तीस हजार रुपये काढले गेले. दोन्ही तक्रारींचा छडा लावत पोलीस सोवोरीअन सर्विस सेंटरवर काम करणाऱ्या रोहित मिश्रा पर्यंत पोहोचले व त्याला अटक केली.
0 टिप्पण्या