इंटरनेट होणार आणखी सुरक्षित
गुगलने अलीकडेच 'गुगल इंडियाऑफ इव्हेंट'मध्ये अनेक टॉप फिचर लॉन्च केले आहेत. आपली इंटरनेट अधिक सुरक्षित करण्यासाठी गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे फिचर आणले आहेत. गुगलने आठ भाषांमध्ये 'गुगल तो अपना हैं' ही मोहीम सुरू केली असून त्यामध्ये युजर्सना फिशिंग वेबसाईट आणि इतर ऑनलाईन जोखमींबाबत माहिती देण्यात येणार आहे.
गुगलने आपल्या 'बी इंटरनेट ऑसम' अभियानाच्या माध्यमातून लहान मुलांना ऑनलाइन सुरक्षेबाबत सजन करण्याचे ठरवले आहे. सध्या ही मोहीम इंग्रजी आणि हिंदी मध्ये असून लवकरच ती अन्य प्रादेशिक भाषांमधील सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेतून पालक आणि शिक्षकांनाही माहिती देण्यात येणार आहे. गुगलने क्रोम ब्राउजर मध्ये अपडेट आणून प्रायव्हसी टूलची घोषणा केली आहे. याशिवाय अँड्रॉइड १२ मध्ये सुरक्षा आणि प्रायव्हसी वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच गुगल आपल्याला ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून कसं सावध राहावे हे सांगणार आहे.

0 टिप्पण्या