ऑलम्पिकमध्ये भारताला ४१ वर्षानंतर ब्राँझ पदक
सततचे पराभव, होत असणारी टीका, शेरेबाजी, हॉकीवर कमी होत चाललेले प्रेम आणि पैशांचा दुष्काळ अशा सर्व मानहानीकारक आणि पराभूत मानसिकतेच्या वातवरणात गेली अनेक दशके पाय रोवून उभी असलेली भारतीय हॉकी टीम जिंकलीच. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने ऑलम्पिकमध्ये ब्राँझपदकावर नाव कोरले. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या लढतीत भारतीय पुरुष हॉकी संघाने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या जर्मनीवर ५-४ अशी मात केली. अखेरच्या क्षणी भारतीयांचे प्राण कंठाशी आले असताना गोलकीपर श्रीजेशने आपल्या खणखणीत कामगिरीने विजयावर शिक्कामोर्तब केले. लढत संपण्यास सहा सेकंद शिल्लक असताना प्रतिस्पर्धी जर्मनीला पेन्लटी कॉर्नर मिळाला. मात्र, श्रीजेशने आपला २१ वर्षांचा अनुभव पणाला लावून जर्मनीचा तो प्रयत्न उधळून लावला. ६० मिनिटांच्या लढतीतील प्रत्येक आव्हान भारतीय संघाने नेटाने परतवून लावत देशवासियांना 'ब्राँझ' पदकाची अनोखी भेट दिली.
फोटो : PTI

0 टिप्पण्या