मुंबई, दादासाहेब येंधे : बोरवली-वसई रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर हल्ला करून तिच्याकडील मोबाईल आणि रोकड घेऊन पळून गेलेल्या आरोपीला बोरवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आकाश धोंडे असे त्याचे नाव असून त्याला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार
तरुणी वसईत राहते. दोन दिवसांपूर्वी ती मालाड येथील बाजारात मासे खरेदीसाठी आली होती.
मासे घेतल्यानंतर ती मालाड येथून बोरवली आणि नंतर बोरवली रेल्वे स्थानकातून वसईला जाणाऱ्या
लोकलमध्ये चढली. ती लोकल बोरवली येथून थेट वसईला जाणार होती. लोकल सुरू होताच महिलांच्या
डब्यात एक तरुण चढला. सकाळी साडेसात वाजता या डब्यात तिच्याशिवाय अन्य कोणीही महिला नव्हती.
नशेत असलेल्या तरुणाने तिच्याकडे पैशासह मोबाइलची मागणी
केली. तिने नकार देताच त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल
आणि रोकड घेऊन तो वसई रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच पळून गेला. तिच्या तक्रारीवरून बोरवली
रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच
अवघ्या २४ तासांत पोलिसांनी वसई येथून आकाशला चौकशीसाठी ताब्यात
घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

0 टिप्पण्या