वयाचा पुरावा द्यावा लागणार
मुंबई : राज्यातील मॉलमध्ये १८ वर्षाखालील मुला मुलींना प्रवेश देण्यास संबंधीची
मार्गदर्शक सूचना शासनाने सोमवारी जारी केली. या
मुला-मुलींना वयाचा पुरावा मॉलच्या प्रवेशद्वारावर सादर केल्यानंतरच आत प्रवेश
दिला जाईल.
१८ वर्षाखालील मुला- मुलींचे करोना लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही.
त्यांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सादर करावे लागेल. मॉल्स रात्री १० पर्यंत
सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मॉल्समध्ये काम करणारे व प्रवेश करणाऱ्या
सर्व नागरिकांचेही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस
पूर्ण होणे आवश्यक राहील. तसे प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र
प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक आहे. अशा मार्गदर्शक सूचना राज्याचे मुख्य
सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केल्या आहेत.


0 टिप्पण्या