Ticker

6/recent/ticker-posts

त्या चिमुकलीचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसाचा सत्कार

 भर पावसात तुंबलेल्या पाण्यात शिरून लहानगीला वाचवले

मुंबई, दादासाहेब येंधे : भर पावसात वडिलांसोबत जात असताना पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडलेल्या मुलीचे कांदिवली वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस नाईक चंद्रशेखर शेगर यांनी प्राण वाचवले. शेगर यांच्या धाडसी कामाची दखल घेऊन सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांचे कौतुक केले.

कांदिवली पश्चिम येथील संजीव अपार्टमेंटमध्ये अरविंद ठक्कर हे राहतात. शनिवारी (१७ जुलै २०२१) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या घरात पाणी शिरले होते. घरात पाणी शिरल्याने मुलांना सुरक्षित म्हणून पुढील काही अंतरावर राहणाऱ्या भावाच्या घरी नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन अरविंद हे त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन निघाले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर तीन फूट पाणी जमा झाले होते. पावसात अरविंद हे मुलीला घेऊन जात असताना अचानक त्यांचा पाय नाल्यात गेला. त्यामुळे अरविंद आणि त्यांची मुलगी पाण्यात पडली. हा प्रकार पोलीस नाईक शेगर यांच्या लक्षात आला.

पावसामुळे वाहतूक चौकीत पाणी शिरल्याने शेगर हे बाहेरच उभे होते. मुलगी पडल्याचे पाहून शेगर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात गेले आणि त्यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढले. त्यांनी त्या मुलीला  आपल्या खांद्यावर घेऊन दोघांनाही सुरक्षित ठिकाणी नेले. भरपावसात मुलीला पाण्यातून नेत असतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओची दखल घेत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव यांनी त्यांचा सत्कार केला. १५ हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन शेगर यांनी त्यांचा गौरव केला.

व्हिडिओ पहा... 👇




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या