“इको कारचे सायलेंसर चोरणारी आंतरराज्य टोळी कळवा पो.स्टे(ठाणे शहर)कडुन जेरबंद"
मुंबई, दादासाहेब येंधे : सौ. रोशनी रमाकांत राउत वय- ५२ वर्षे, राहणार २०२, कार्तिका व्हीला, उर्जा प्रतिक अपार्टमेंट समोर, देवकीनंदन बॅस स्टॉप जवळ, खारेगाव, जि.ठाणे यांनी त्यांच्या मालकीची इको कार नंबर एमएच.०२.एफ.जी.४६४९ ही दि.०५/०६/२०२१ रोजी १७:४५ वा. ते दि.०६/०६/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वाजण्याचे दरम्यान त्यांच्या घराच्या समोरील सार्वजनीक रोडवर पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयांनी सदर कारचा सायलन्सर चोरी करुन घेऊन गेले होते. त्याबाबत त्यांनी दिलेल्या तकारीवरुन कळवा पो-स्टे.गुर.नंश १८०/२०२१ भा.द.वि.क.३७९ प्रमाणे दि.०६/०६/२०२१ रोजी १३.०१ वा. गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भारत चौधरी यांनी त्वरीत अज्ञात आरोपीताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे अनुषंगाने गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळया ०२ टीम तयार केल्या. सदर पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन, घटनास्थळाचे व आजुबाजुच्या परिसरातील राहत्या इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेराचे रेकॉडींग पाहुन, त्यामध्ये संशयीत इसमांची पडताळणी करुन व सी.सी.टी.व्ही फुटेज मधील संशयीत इसमांची चेहरेपटटीची सी.टी.व्ही.फुटेजद्वारे पडताळणी / खातरजमा करुन, घटनास्थळावरील प्राप्त फुटेज मधील संशयीत आरोपीत इसमांची संपुर्णत: खातरजमा करण्याकरीता खारेगाव ते कुर्ला, मुंबई कडे जाणारा-येणा-या सर्व मार्गावरील सी.सी.टी. व्ही. कॅमे-यातील फुटेजची पडताळणी केली असता, सदरचे संशयीत इसम हे कुर्ला, मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे, तांत्रीक माहिती तसेच गुप्त बातमीदारामार्फत सदर संशयीत आरोपीत इसमांचे राहत्या ठावठिकाण्याबाबतची माहिती काढून सदरचे संशयीत इसम हे कपाडीयानगर, कुर्ला मुंबई येथे वास्तव्यास असल्याबाबतची माहिती प्राप्त करून, त्या ठिकाणी गुन्हे शोध पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी गुप्तरित्या सापळा रचुन संशयीत आरोपीत इसम नामे- १)समशुददीन मोहंमदअदीस शहा, वय. २१ वर्षे, रा. मोहंमद इस्टेट, बीकेसी, कुर्ला, मुंबई, २)नदीम उर्फ नेपाळी नवाब कुरेशी, वय. २१ वर्षे, रा. म्हाडा बिल्डिंग, रुम नं. ६०२, कोहीनुर हॉस्पिटल, जवळ, कुर्ला, ३)समशुद्यीन मजुउददीन खान, व. २२ वर्षे, रा. कपाडीयानगर, गाळा नं. ६, रबानी हॉटेल जवळ, कुर्ला, मुंबई, ४)सद्याम मकैस खान, वय. २६ वर्षे, रा. मेहबुब चाळ, कलीना डोंगर, कुर्ला, मुंबई यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या सायलेंसर बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी वरील गुन्हयातील इको कारचा सायलेंसर काढून त्याची चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना लागलीच ताब्यात घेवून त्यांना दिनांक १३/०७/२०२१ रोजी १८:१२ वाजता अटक करण्यात आलेली आहे.
तसेच दाखल गुन्हयाचे तपासात वरील अटक आरोपीतांकडे अधिक तपास करता त्यांनी एकूण २५ गुन्हे केल्याची कबुली दिलेली असून, सदर गुन्हयातील चोरीस गेलेले एकूण २५ सायलेंसर जप्त करुन हस्तगत करण्यात आलेले आहेत.
तसेच यातील अटक आरोपीत नामे समशुददीन मोहंमदअदीस शहा, वय. २१ वर्षे, रा.मोहंमद इस्टेट, बीकेसी, कुर्ला, मुंबई हा रायगड जिल्हयातील . वेगवेगळया पोलीस ठाण्यांचे हददीतील दाखल असलेल्या एकूण १० गुन्हयांमधील पाहीजे आरोपी आहे. अटक आरोपीतांकडून ठाणे, नवीमुंबई, पालघर, रायगड, पुणे, या जिल्हयातील व गोवा राज्यातील असे एकूण २५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यातील चोरीस गेलेले ६,५०,०००/- रुपये किंमतीचे एकूण २५ सायलेंसर जप्त करुन हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री.विनाश अंबुरे सो, पोलीस उप आयुक्त, परि.-०१, ठाणे, माश्री.व्यंकट आंधळे, सहायक पोलीस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भारत चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.सुदेश आजगावकर, पोलीस निरीक्षक, गुन्हे, पोउपनिरी शिरीष यादव, सपोउपनिरी डी.जी.देसाई, पोहवा/ ३७९३ पाटील, पोहवा/४४४६ एस.व्ही.एडके, पोहवा/४९५० दराडे, पोना/४६३९ बिर्हाडे, पोना/ ३२३० चौरे, पोना/६५५८ थोरात, पोना/ ६४३५ तडवी, पोना/महाडीक, पोना/७२६१ माळी(तांत्रीक माहिती),पोशि/ढावरे, पोशि/ २४१० ढेबे यांनी कसोशिने, कौशल्यपुर्वक व अतिशय मेहनत घेवुन केलेली आहे. सदर गुन्हयाचा पोउपनिरी एस.ए. यादव, नेम.कळवा पोलीस स्टेशन हे तपास करीत आहेत.

0 टिप्पण्या