Ticker

6/recent/ticker-posts

सन्मान 'खाकी'चा

कर्तव्यापलीकडील कार्याचा यथोचित सन्मान


मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होऊन जनतेचे संरक्षण पोलीस दल करीत आहे. कुठेही कर्तव्यात कसूर नाही. दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. 


लोहमार्ग पोलिसांमधील काही निवडक पोलीस बांधवांनी तर आपल्या कर्त्यव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात आपले कार्य सुरू ठेवले आहे.  


त्यातील काही निवडक पोलीस अधिकारी, अंमलदारांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या संकल्पनेतून अशा पोलिसांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 


त्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठानेतील गोरक्षनाथ मोहिते हे गेले दीड वर्ष आपले कर्तव्य बजावत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील एन्ट्री गेटवरून स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाबत मेगाफोनद्वारे जनजागृती करून त्यांना सुयोग्य मार्गदर्शन तसेच मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा असा सामाजिक संदेश देताना दिसून येत आहेत. हीच गोष्ट हेरून त्यांचा नुकताच घाटकोपर येथील नवरंग हॉलमध्ये अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याहस्ते  प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी  लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद तसेच नागपूर, औरंगाबादचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या