Ticker

6/recent/ticker-posts

गणपती महोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ७२ विशेष गाड्या

गणपती उत्सव २०२१ दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड / रत्नागिरी आणि  पनवेल -  सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.

 १. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ विशेष)
01227 विशेष दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ५.९.२०२१ पासून २२.९.२०२१ पर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल.
01228 विशेष दररोज सावंतवाडी रोड येथून ५.९.२०२१ पासून २२.९.२०२१ पर्यंत १४.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
 
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० विशेष)
01229 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ६.९.२०२१ पासून २०.९.२०२१ पर्यंत दर सोमवारी व शुक्रवारी १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
01230 द्वि-साप्ताहिक विशेष रत्नागिरी येथून दिनांक ९.९.२०२१ पासून २३.९.२०२१ पर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी २३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसर्‍या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे (केवळ 01229 साठी), पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड,
 
३. पनवेल-सावंतवाडी रोड त्रि – साप्ताहिक विशेष (१६ विशेष)
01231 त्रि- साप्ताहिक विशेष पनवेल येथून दिनांक ७.९.२०२१ पासून २२.९.२०२१ पर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सावंतवाडी रोडला २०.०० वाजता पोहोचेल.
01232 त्रि- साप्ताहिक विशेष सावंतवाडी रोड येथून दिनांक ७.९.२०२१ पासून २२.९.२०२१ पर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी २०.४५ वाजता सुटून पनवेलला दुसर्‍या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल.

थांबे : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
 
४. पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० विशेष)
01233 द्वि-साप्ताहिक विशेष पनवेल येथून दिनांक ९.९.२०२१ पासून २३.९.२०२१ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
01234 द्वि-साप्ताहिक विशेष रत्नागिरी येथून दिनांक ६.९.२०२१ पासून २०.९.२०२१ पर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी २३.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.०० वाजता पनवेलला पोहोचेल.

थांबे : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.
 
संरचनाः या सर्व विशेष गाड्यासाठी - एक द्वितीय वातानुकुलीत सह तृतीय वातानुकुलीत, चार तृतीय वातानुकुलीत, ११ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी आसन.
 
आरक्षण: सर्व विशेष गड्यासाठी आरक्षण विशेष शुल्कसह दिनांक ८.७.२०२१ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.

तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सर्व प्रकारच्या मानदंडांचे, कोविड-१९शी संबंधित मानकांचे  पालन अनिवार्य  असणा-या या विशेष ट्रेनमध्ये फक्त आरक्षित तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल.





















































































































 प्रप क्र. 2021/07/09

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या