पुण्यातून केली अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : मलबार हिल परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तक्रारदार यांनी दिनांक १७/०६/२०२१ रोजी कुटुंबासह लोणावळा येथे दिनांक २४/०६/२०२१ ते २७/०६ /२०२१ रोजी दरम्यान सुट्टी घालवण्याचे नियोजित केले होते. त्यांनी इंस्टाग्राम वर lonavala_villa77 या अकाउंटवर बंगला भाड्याने मिळेल अशी जाहिरात वाचून दिलेला संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना मोबाईल क्रमांक 9529971404 यावर व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करणे बाबत रिप्लाय मिळाला. समोरील व्यक्तीने फिर्यादीस बंगल्याचे फोटो पाठवले फिर्यादीने भाडे विचारले असता त्याने एका रात्रीसाठी नाश्ता व जेवणासह २८,०००/- भाडे लागेल असे सांगितले तसेच बंगल्याचा पत्ता बंगला क्रमांक ते ३३-३४ कुणे व्हिलेज, खंडाळा- लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०५ असा सांगितला. त्यानंतर समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी आरबीएल बँकेचे खाते क्रमांक 309013336219 वर IMPS ने रुपये ३०,०००/ आणि एसबीआय बँकेचे खाते क्रमांक 20316173741 या खात्यावर रुपये २०,०००/ इतकी रक्कम भरली व पाठवली. आरोपींनी त्यांना lonavalavillas77@gmail.com ह्या इमेल वरून रिसीट पाठवून दिली पुढील पाठपुरावा करण्याकरता नमूद व्हाट्सअप धारकाने मोबाईल क्रमांक 9156168118 व 8390864676 दिला .दि. २४/०६/२०२१ रोजी फिर्यादीस वर नमुद व्हाट्सअँप क्रमांक वरून मेसेज प्राप्त झाला की त्यांनी बुकिंग केलेल्या बंगल्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ब्लास्ट झाल्याने सदर बंगल्यातील एसी टीव्ही फ्रीज हे डॅमेज झाले असल्याने येऊ नका असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी त्याचे पैसे परत मागण्याकरिता मोबाईल क्रमांक 9156168118 व 8390864676 यावर संपर्क साधला असता दोन्ही क्रमांकानी तक्रारदाराचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर तक्रारदाराने व्हाट्सअप वर संपर्क साधला असता त्याचा कोणताही रिप्लाय मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणावळा येथील त्यांच्या ओळखीच्या इसमास बंगल्याच्या पत्त्यावर जाऊन चौकशी करण्यास सांगितले सांगितले असता इंस्टाग्राम वरील जाहिराती मधील पत्ता चुकीचा असल्याचे व नमूद पत्त्यावर lonavala_villas77@ या नावाने कोणताही बंगला नसल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक २१०/२०२१ कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, भादवि. सह कलम ६६ (क)(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा हा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता आरोपीचे मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त केले असता सदर लोकेशन कल्याणी नगर वडगाव शेरी पुणे शहर परिसरात असल्याचे प्राप्त झाले.
आरोपीचा शोध घेण्याकरिता सपोनि डिगे. व सायबर पोलीस पथक दिनांक २९/०६/२०२१ रोजी रवाना झाले. पुणे शहर येथे जाऊन आरोपीचे मोबाईल क्रमांक इंस्टाग्राम आयडी व बँक खात्याची प्राप्त माहिती यांचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नावे अविनाश रूपकुमार जाधवांनी राहणार ठिकाण फ्लॅट नंबर १०२ मित्तल क्रिस्ट बिल्डिंग कल्याणी नगर पुणे व आकाश रूपकुमार जाधवानी राहणार ठिकाण फ्लॅट नंबर ११०४, टॉवर नंबर ३- एफ, रेसीडेन्सी ब्रह्मा सन सिटी, वडगाव शेरी, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. नमूद दोन आरोपी भावांना ताब्यात घेऊन त्यांना मलबार हिल पोलिस ठाणे येथे आणून दिनांक ३०/०६/२०२१ रोजी अटक करण्यात आली. नमूद अटक आरोपींना माननीय महानगर दंडाधिकारी ४० वे न्यायालय गिरगाव मुंबई यांच्या न्यायालयात हजर केले. नमूद आरोपी सध्या ०४ जुलै २०२१ रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नमूद आरोपींचा मलबार हिल पोलिस ठाणे मुंबई येथे नोंद इतर गुन्ह्यात ताबा घेण्यात येणार आहे.
आरोपी अविनाश रूपकुमार जाधवानी उर्फ करण उर्फ सिद्धेश, वय २६ वर्षे, रा.ठी. प्लॅट नं. १०२, मित्तल क्रिस्ट इमारत, कल्याणी नगर, पुणे.२) आकाश रूपकुमार जाधवानी, वय २२ वर्ष, रा. ठी. प्लॅट न. ११०४, टॉवर नं. ०३, वडगाव शेरी, पुणे अशा दोन आरोपींना ३०/०६/२०२१ रोजी अटक केली. गु.र.क्र. - २१०/२१ कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, ३४ भादवी सह कलम ६६ (सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा अनव्ये २४/०६/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडे केलेल्या तपासात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती
मलबार हिल पो. ठाणे
१ ) गु.र.क्र. :- २१०/ २१ कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, ३४ भादवि सह ६६(सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा
२) गु.र.क्र.:- २२०/२१कलम ४२० भादवी कलम ६६(सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा.
डी बी मार्ग पोलीस ठाणे
३) गु.र.क्र. :- 550/2021 U/S 419, 420, IPC R/W 66(C)(D)IT ACT
दादर पोलिस ठाणे
४) गुन्हा नोंद क्रमांक ४५७/२०२१U/s ४२०, ४६८, ४७१,भादवि सह कलम ६६(क)(ड)
ठाणे नगर पोलीस ठाणे
५) गु.र.क्र. ११४/२०२१ कलम ४२० भादवी.
मुंलुड पोलीस ठाणे -
६) गु.र.क्र. ७२१/२१ कलम ४२० भादवी ६६ ( डी ) माहिती तंत्रज्ञान कायदा.
गुन्ह्यात वापरलेली बँक खाती
1) SBI Bank A/c no. 20316179741
2) Kotak Mahindra Bank A/c no. 7145660007
3) Kotak Mahindra Bank A/c no. 3211857159
4) RBL Bank A/c no. 309013336219
5) Standard Chartered Bank A/c no. 27011865730
6) HDFC Bank A/c no. 59143333377777
गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक :- 9656168118, 9529971404, 8390864676, 8169833658
Instagram Fake Account – lonavala_villa77
Emaili ID - lonavalavillas77@gmail.com
नमूद आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने मुंबई व महाराष्ट्रात अनेक जणांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा गुन्हा पोनि अमोल टमके. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डिगे, पो.शि. १११३४९/धारवाडकर, पो.शि. १११३८५/कदम, पो.शि. ०९३४४४/संदे (सायबर पथक) यांनी उघडकीस आणला असुन, तांत्रिक तपासादरम्यान परि. २ कार्यालय येथील पो.शि. 03505 / मुन्ना सिंग यांनी मदत पुरविली आहे. अशी माहिती मलबार हिल पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी दिली आहे.
प्रेस नोट


0 टिप्पण्या