Ticker

6/recent/ticker-posts

गणेशोत्सव / नवरात्रोत्सवावेळी मूर्त्या तयार करुन विक्री करणा-या मूर्तिकारांना ऑफलाईन पद्धतीने परवानगी

गणेशोत्सव / नवरात्रोत्सवावेळी मूर्त्या तयार करुन विक्री करणा-या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप बांधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून देण्यात येणा-या परवानग्या गत वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत. या पद्धतीने देण्यात येणा-या परवानग्या स्वतः मूर्ती तयार करुन विक्री करणा-या मूर्तिकारांनाच देण्यात येतील. तसेच तयार मूर्त्या बाहेरुन आणून फक्त विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी मान्य करण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

मूर्तिकारांना मंडपाकरीता परवानगी देण्यासाठी सन २०२१ करीता लागू असलेल्या विविध स्तरीय शुल्काबाबतचे परिपत्रक महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर परिपत्रक हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असून त्यासाठीची लिंक पुढीलप्रमाणे आहेः

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis

तरी कृपया वरील तपशीलानुसार सर्व संबंधितांनी महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन या निमित्ताने करण्‍यात येत आहे.



































































(जसंवि/२०२)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या