मुंबई , दादासाहेब येंधे : माटुंगा येथे वाटेतच टॅक्सी अडवून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली होती.
दिनांक २/७/२१ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टॅक्सी चालकाला अनोळखी इसमाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावरून माटुंगा पोलीस ठाण्यात गु.र.क्र ४२०/२१ कलम ३०७, ३९४ भा.द.वि. प्रमाणे नोंद करण्यात आली होती.
सदरचा गुन्हा नोंद झाल्याची माहितीवरून गु.प्र.शा. गुअ.वि. कक्ष ४ चे पोलीस पथक नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा अहोरात्र शोध घेत होते.
मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून व गुप्त बातमीदांच्या मदतीने नमूद आरोपीचा शोध घेत असताना आज पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास स.पो.नि. बिराजदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, नमूद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा बंगालीपूरा वडाळा परीसरात लपून बसला आहे. मिळालेल्या खबरीवरून स.पो.नि. बिराजदार, स.फौ.राउत, पो.ह.कांबळे ३४२७९, पो.ह. सावंत २८७९० यांनी नमूद आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा २.३० वाजण्याच्या सुमारास रफिक शहा बाबा दर्ग्याच्या बाजूला, लाल मीठ्ठी, किस्मत नगर, बंगालीपूरा, वडाळा, मुंबई. ३७ या ठिकाणी मिळून आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता नमूद पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेण्यात आले व कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद यासीन मोहम्मद शफी शेख. वय २३ वर्ष. रा.ठी. रू.नं. ५८०, न्यु ट्रांझिट कॅम्प, मिरा दातार दर्गा, बंगालीपूरा वडाळा मुंबई ३७ येथून अटक करण्यात आली आहे.
आरोपीस कायदेशीर पूर्तता करून माटुंगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अशी माहिती प्रेस नोटद्वारे कक्ष ४ चे पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या