Ticker

6/recent/ticker-posts

बंद घरात चोरी करणाऱ्या तिघांना अटक

वाकोला पोलीस ठाणेची जबरदस्त कारवाई

मुंबई, दादासाहेब येंधे :  दि. ११मे २०२१ रोजी ६.०० वाजल्यापासून ते दिनांक १२ मे २०२१ रोजी ९ चे दरम्यान तक्रारदार श्री. नेपो मोसियानो जुबी डिकोस्टा. वय ७६ वर्ष हे सेवानिवृत्त असेलेले वृद्ध रहिवासी, राहणार डिकोस्टा हाऊस, गोळीबार तिसरा रोड, सांताक्रूझ, (पूर्व ) मुंबई यांनी पोलिस ठाणेत जाऊन कळविले की, त्यांच्यावरील घराला कुलूप लावून ते त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरामध्ये चोरी केली आहे. म्हणून त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून ( वाकोला पो. ठाणे, गु. र. क्रमांक - ५१७/२०२१, कलम ३८०, ३४ भादवि.,  वाकोला पोलिस ठाणे गु. र. क्रमांक - ४६९/२०२१ कलम ३७९ भादवी.) प्रमाणे गुन्हा दाखल आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता कोणतीही उपयुक्त माहिती मिळून आली नव्हती. आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की, आरिफ व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये चोरी केली असल्याचे गुप्त बातमीदारांनी माहिती दिली होती. आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, आरिफ नावाचा इसम हा गोळीबार परिसरात राहत असून चोरी झाल्यापासून सदर इसम हा त्याच्या राहत्या परिसरातून गायब असल्याबाबत माहिती मिळाली गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदर आरोपीचा शोध चीता कँप, ट्रॉंबे परिसरात घेतला असता सदर ठिकाणी आरिफ मिळून आला सदर इसमास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याचे नाव विचारले असता  त्याने त्याचे नाव आरिफ अब्दुल रकिब खान वय २६ वर्ष, राहणार एकता चाळ, मिलनसार भरणी मशिद जवळ, नेहरु रोड, सांताक्रूझ पूर्व, मुंबई असे सांगितले.

गुन्ह्याच्या तपास करीत असताना आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात स्पष्ट सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी त्याच्या इतर दोन साथीदार यांची देखील माहिती दिली. यातील दुसरा आरोपी चिंटू उर्फ हैदरअली सदाउद्दिन काचवाला यास त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे  विचारपूस केली असता त्याचाही नमूद गुन्ह्यात स्पष्ट सहभाग निष्पन्न झाला. तसेच तिसरा साथीदार रोहित रमेश राठोड. सदर आरोपी  हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर इतर विविध पोलीस ठाणेत अजून गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगाराचा त्याचा राहत्या परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता. गुप्त बातमीदार यांच्या मदतीने शिताफीने सापळा लावून गोळीबार कब्रस्तान नाल्या जवळून सदर आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाणेत आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच आरोपीेवर नमूद हस्तगत मालमत्तेच्या निवेदन पंचनामा अंतर्गत सादर केली व यातील आरोपी आरिफ व चिंटू उर्फ हैदर अली यांनी वाकोला पोलिस ठाणे हद्दीतून एक मोटर सायकल होंडा यूनिकॉर्न हे चोरी केल्याचे तपासादरम्यान निवेदन केले. निवेदन पंचनामा अंतर्गत होंडा युनिकॉन हे मोटर वाहन ताब्यात घेण्यात आले.

तपास करत असताना तीन आरोपींना ताब्यात घेतले असून   १) रोहित रमेश राठोड, वय २६ वर्ष, धंदा नाही, राहणार राज बली दुबे चाळ, गोळीबार ३ रोड, सांताक्रूझ पूर्व, मुंबई.

२) आरिफ अब्दुल रकिब खान वय २६ वर्ष, धंदा नाही, राहणार एकता चाळ, मिलनसार भरणी मशिद जवळ, नेहरु नगर, गोळीबार सांताक्रूझ पूर्व मुंबई.

3) हैदर अली उर्फ चिंटू सजा उद्दिन काच वाला वय ३५ वर्ष, राहणार गोळीबार मच्छी मार्केट समोरील झोपडपट्टी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, मनगटी घड्याळ, आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 

यातील अटक केलेला आरोपी रोहित रमेश राठोड याच्यावर याआधी एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.

याकामी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांच्यासोबत पो. ना. 971172/सौंदनकर,पो.ना. 03204 पाटील,पो शि. 111443 पोटे, पो.शि. 113219 बारावकर, पो. शि. 130480 मिस्त्री. आदींनी कर्तव्य बजावले. अशी माहिती वाकोला पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनयना नटे यांनी प्रेस नोटद्वारे दिली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या