Ticker

6/recent/ticker-posts

विक्रोळीत घरे कोसळून जीवितहानी

 मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे विक्रोळीतील सुर्यानगर येथे झालेल्या दुर्घटनेत जाधव, विश्वकर्मा आणि तिवारी कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

विक्रोळी सुर्यानगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टीमुळे येथील कुटुंबीय जीव मुठीत घेऊन जगत असताना डोंगराला लागून असलेली ७ घरे कोसळली. या घरांवर शनिवारी मध्यरात्री २.४० वाजता सुर्यानगरमधील पंचशील चाळीतील सहा घरांवर दरडीचा भाग कोसळला. 

यात तीन घरे मातीखाली दबली गेली. स्थानिकांकडून बचावकार्य सुरू झाले. पोलीस, अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या