मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे पडझडीच्या घटना घडत असून शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास फोर्ट येथील शहीद भगतसिंग रोड वरील म्हाडाच्या अप्सरा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सीलिंगचा काही भाग जमिनीवर कोसळला. दुर्घटनेवेळी इमारतीत वीस जण अडकले होते. मुंबई अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुखरुप सुटका केली. सीलिंगचा काही भाग जिन्यांवरही कोसळल्याने येथील मार्गक्रमण बंद झाले होते. इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली. घटनेची माहिती मिळताच येथे दाखल झालेल्या मुंबई अग्निशामक दलाच्या जवानांनी वीस जणांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

0 टिप्पण्या