मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवार दिनांक ३ जून २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. दरम्यान, उद्या दिवसभरामध्ये लससाठा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील
दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई
महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
(जसंवि/१३९)
0 टिप्पण्या