Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण दिनानिमित्त मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोडच्या परिसरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल (५जून) वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी मंत्री सचिन अहिर, महापालिका उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त शरद उघाडे आदी उपस्थित होते. 

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्डमार्फत याठिकाणी एक हजार स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या