मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर गोड्या पाण्याचे स्तोत्र आढळून आले आहेत. शिवाजी पार्क या ठिकाणी ३०० मीटर या अंतरावर समुद्र किनारा आहे. मात्र, तरीही शिवतीर्थावर गोड्या पाण्याचे स्रोत आढळले.
शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आल्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांकडून परीक्षण करण्यात आले असता ५ स्रोतांद्वारे एकूण ३५ रिंग विहिरी खणण्यात येत असतानाच गोड पाणी सापडले. या विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सतत गोड्या पाण्याने भरलेल्या राहतील, अशी व्यवस्था होणार आहे.
पार्कमधल्या धुळीचा प्रश्न मिटण्यासाठी दररोज पाण्याचे फवारे मारण्याची गरज होती. २४ एकराच्या शिवाजी पार्कवर यासाठी रोजचे ३ लाख लिटर पाणी लागते. एवढे पाणी आण्याचे कुठून, असा प्रश्न होता. तयामुळे जमिनीखालच्या पाण्याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी तेथे गोड्या पाण्याचे स्तोत्र आढळले.


0 टिप्पण्या