मुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रजाहितदक्ष आणि लोकाभिमुख कारभाराचा आदर्श अहिल्यादेवींनी घालून दिला. त्यांनी जनसामान्यांच्या सोयी-सुविधांचा संवेदनशीलतेने विचार केला. यातून निर्माण झालेल्या वास्तू, सुविधा आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभ्या आहेत. शौर्य, धैर्य, आणि न्यायाच्या मुर्तीमंत रूप अशा अहिल्यादेवींच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

0 टिप्पण्या