टिळकनगर ते चेंबूर दरम्यामची घटना
मुंबई : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू आहेत. नुकतीच एक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी दुपारी २.१२ वा. पनवेलकरिता सुटलेल्या लोकलमध्ये कर्तव्यावर असताना मोटरमन पी.के. रत्नाकर यांना टिळकनगर ते चेंबूर दरम्यान एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पडलेली दिसली.
टिळकनगर-चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शनमध्ये गाडी असल्याने गाडीचा वेग कमी होता. त्यांनी तातडीने ब्रेक लावले आणि ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर ट्रेन थांबविली. ट्रॅकवर एक व्यक्ती पडल्यामुळे ट्रेन थांबवण्यात आल्याचे समजताच ट्रेनमधील काही प्रवासीही मोटरमनच्या मदतीसाठी धावले. त्यांनी त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटरमनला मदत केली. त्यानंतर लोकलच्या गार्डमार्फत या अपघाताबाबतची माहिती कंट्रोलला देण्यात आली.


0 टिप्पण्या