पाठलाग करून मोबाईल चोराला केली अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : कैलास बन्सी भांगे हे वाडीबंदर येथे हाऊस किपिंगचे काम करतात. भायखळा येथे लोकल ट्रेन पकडण्यासाठी उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. पण, सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने मोबाईल पुन्हा मिळवून दिला.
श्री. भांगे व त्यांचा भाऊ हे १ मे रोजी भायखळा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी ११.५५ वाजता उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या डाव्या हातात असलेला विवो कंपनीचा मोबईल फोन जबरदस्तीने खेचुन फलाट क्रमांक २ क्रॉस करुन फलाट क्रमांक १ वरुन पळुन जात असतांना त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केला असता त्यांच्यासोबत असलेला त्यांचा भाऊ तुकाराम भांगे हा त्याचे पाठीमागे चोर चोर असा आरडा ओरडा करत पळाला.
त्यानंतर सदर अनोळखी इसम हा फलाट क्रमांक ०१ जवळील भिंतीवरुन उडी मारुन भायखळा रेल्वे स्टेशनचा बाहेर पळून गेला.
त्याच्यामागे त्यांचा भाऊ तुकाराम भांगे हा पाठलाग करीत पळाला तेव्हा ते पाहुन स्टेशन डयुटीवरील आरपीएफचे कर्मचारी एएसआय बनकर व कॉन्स्टेबल अरुण तोमर देखील काही वेळातच त्या चोरट्याच्या मागे भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोहोचले. तेव्हा तेथे जमलेल्या काही लोकांनी आरडा ओरडा ऐकुण त्यास पकडुन ठेवले होते. प्रसंगी सदर इसम हा लोकांबरोबर झटापट करुन त्यांच्या ताब्यातुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळेस आरपीएफ कर्मचारी एएसआय बनकर व कॉन्स्टेबल अरुण तोमर यांनी त्यास ताब्यात घेतले व त्यास भायखळा रेल्वे स्टेशन फलाट क्र.०४ वरील जीआरपी पोलीस चौकी येथे आणले.
पोलीसांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे याबाबत माहीती कळविली असता तेथील पोलीस कर्मचारी पोहवा/ २९४ मोहीते व पोशि/४०२ इंगवले हे भायखळा रेल्वे स्टेशन येथे पोहोचून त्या मोबाईल चोरट्यास ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी त्यास सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे सोबत घेवुन गेल्यावर ठाणे अंमलदार यांचे समक्ष हजर केले असता, त्यांनी दोन पंचाना पोलीस ठाणेत बोलावुन पंचासमक्ष पोलीसांची ताब्यातील चोरट्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव शोएब अब्दुल शेख वय-२० वर्षे, राहणार-घर नंबर ११, शहनशाह चाळ, अमृतनगर,कौसा मुंन्रा जि.ठाणे मुळगाव -दिल्ली (पुर्ण पत्ता माहीत नाही) असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या उजव्या खिशात जबरी चोरी करुन चोरुन नेलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला.
त्याचे वर्णनखालीलप्रमाणे.
१) १२,००० /-रु.कि.चा सिमर ब्ल्यु रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

0 टिप्पण्या