खाकी वर्दीने घडवले माणुसकीचे दर्शन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २ मे, २०२१

खाकी वर्दीने घडवले माणुसकीचे दर्शन

गरिबांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना महामारीत गरिबांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी गेल्या लॉक डाऊनमध्ये अन्न, तसेच काही जीवनावश्यक वस्तू वाटल्या. यावर्षी मात्र,  तसे चित्र कुठेही दिसून येत नाही. 

अशा कठीणप्रसंगी अनेक ठिकाणी खाकीवर्दीतली माणुसकी दिसून येत आहे. कांदिवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी पोलिस मित्रांसह परिसरातील फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबांना अन्नाचे वाटप केले. 

एरवी पालिका आणि पोलिसांची धास्ती घेणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबीयांना खाकीवर्दीतील आपुलकीचे दर्शन झाले.  चारकोप, पोईसर लिंक रोडवर, बोईसर डेपोच्या परिसरात पदपथावरील आणि कपूर विद्यालय परिसरात गोर गरीब कुटुंबे राहतात. लॉकडाऊन काळात जवळपास सर्व मार्ग बंद झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी एक मोठी समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. या मार्गावर नेहमी गस्त घालण्याऱ्या पोलिसांना त्याची जाणीव झाली. पोलिसांनी एकत्र येऊन गरीब, गरजूंच्या जेवण्याची आणि पाण्याची व्यवस्था केली. तसेच लहानग्यांना स्वतः जेवण वाढले. पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे रस्त्यावरील मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज