Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, राष्ट्रीय एकात्मता आणि ग्रामविकासाचे स्वप्न रुजविण्यासाठी तुकडोजी महाराज यांनी आयुष्य वेचले. प्रबोधनातून समाजातील अनिष्ट प्रथांवर आघात केला. ग्रामगीतेच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला. समाजाला एकसंध ठेवण्याचे त्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत. महान संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या