Ticker

6/recent/ticker-posts

शाळा, कॉलेजेसच्या मे महिन्याची सुट्टीबाबत आज परिपत्रक निघणार आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

दिनांक  : ३० एप्रिल २०२१

आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रानंतर आणि फोनवरून चर्चा केल्यानंतर शिक्षण संचालक यांनी आज शाळा, कॉलेजेसच्या मे महिन्याच्या सुट्टीबाबत परिपत्रक निघेल असं सांगितलं आहे. वडिलांच्या निधनाने दुःखात असूनही शिक्षणमंत्री यांनी तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालक यांचे आभार मानले आहे. 

एप्रिल महिना संपत आला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षाही रद्द झाल्या मात्र तरीही शाळा, कॉलेजेसना मे महिन्याची सुट्टी जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्रचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांना याबाबत पत्र पाठवलं. फोनवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आजच याबाबत परिपत्रक निघत आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पगार वेळेवर नसतानाही कोरोनाची ड्युटीही केलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी त्यांना वेळ मिळणेही आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळा, ज्युनिअर कॉलेजेसना विहित पद्धतीने मे महिन्याची सुट्टी तात्काळ  जाहीर करावी, अशी मागणी कपिल पाटील यांनी आज लिहलेल्या पत्रात केली होती.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या