Ticker

6/recent/ticker-posts

उत्तन परिसरातील नागरिकांसाठी डोंगरी चौक येथे कोव्हीड सेंटर उभारणीसाठी खासदार राजन विचारे यांचा आयुक्तांसोबत पहाणी दौरा...

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात भाईंदर पश्‍चिमेकडील उत्तन येथील नागरिक मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात या परिसरात मच्छीमार व्यवसायिकांची ये-जा अधिक असल्याने याठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे येथील गरीब मच्छिमारांना शहरात बेड उपलब्ध होत नसल्याने घरात उपचार घेत असत. त्यामुळे त्या कुटुंबातील इतरांना ही त्याची लागण होत होती. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उत्तन परिसरातील डोंगरीचौकपाली येथील स्थानिकांसाठी खासदार राजन विचारे यांनी नुकताच महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना डोंगरी चौक येथील नव्याने होत असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत कोव्हीड सेंटर उभारणीसाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौऱ्यात ८० बेडचे रुग्णालय करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी माहिती दिली.

त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे भेट घेऊन नव्याने बसविण्यात येणाऱ्या १७५ जंबो सिलेंडर पाहणी केली.

त्यानंतर कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिराभाईंदर महानगरपालिका येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संपुर्ण शहरातील कोविडच्या स्थितीबद्दल माहिती घेण्यात आली. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणमृत्युदरदररोज होणाऱ्या चाचण्याऑक्सिजन बेड्सआयसीयु बेड्सची माहिती घेतली. तसेच मिरा भाईंदर मधील इतर रूग्णालयात असलेल्या सुविधांसंदर्भात माहिती घेतली. रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध रुग्णवाहिकाअँटिजनटेस्टकोविड वॉर रूम आदी विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी तसेच पालघर जिल्हाधिकारी त्याच बरोबर पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून मीरा-भाईंदर शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करण्यासाठी मागणी केली त्यासंदर्भात शहरातील रुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सिलेंडरची क्षमता या बद्दल संपूर्ण माहिती सादर करावीत्याप्रमाणे पुरवठा केला जाईल असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.

या बैठकीस महापालिकेने आयुक्त दिलीप ढोलेआमदार गीता जैनजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रेविरोधी पक्षनेता प्रवीण पाटीलगटनेत्या नीलम धवनशहर प्रमुख लक्ष्मण जंगमपप्पू भिसे उपशहर संघटक तेजस्वी पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पाहणी दौऱ्यात माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, विधानसभा क्षेत्र विक्रम प्रताप सिंग नगरसेवक एलियस बंड्या नगरसेविका शर्मिला बगाजीहेलन जॉर्जीशहर प्रमुख बर्नाड डिमेलो उपस्थित होते. 





















प्रेस नोट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या