Ticker

6/recent/ticker-posts

सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा दुकाने खुली

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही किराणा दुकानात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या दुकानांना सकाळी सात ते अकरा या वेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला आहे. मात्र,  या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार ते सोमवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. किराणा दुकाने चा रस्ता स्कूल ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या