Ticker

6/recent/ticker-posts

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी ४८ तासांत रॅम्प

नवी मुंबई, दादासाहेब येंधे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात द्रवरूप ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी रेल्वेतर्फे 'ऑक्सिजन एक्सप्रेस' चालवली जाणार आहे. मुंबईजवळील कळंबोली या रेल्वे स्थानकातून रिकामे टँकर रवाना केले जाणार आहेत. त्यासाठी विशाखापट्टणम येथून रेल्वेमार्गे टँकरमधून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोली येथे प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर टँकर चढविण्यासाठी अवघ्या ४८ तासांत रॅम्प उभारणी करण्यात आली आहे. वेगाने उभारण्यात येणाऱ्या या रॅम्पमुळे हजारो टन ऑक्सिजन आणणे सोपे होणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या