मुंबई : मुंबईत सध्या आगीचे सत्र सुरुच असून बुधवारी कुर्ला-सांताक्रूझ मार्गावरील भंगार गोदामाला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामे खाक झाली असून यात एक अग्निशमन जवान जखमी झाला आहे. काल रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. दरम्यान महापौरांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येत असून सर्वच धोकादायक ठिकाणचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश अग्निशमन दलाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.

0 टिप्पण्या