अशाप्रकारे गृह विलगीकरणात असुनही घराबाहेर फिरणा-या दिघा विभागातील हिंदमाता विद्यालयाजवळील एका व्यक्तीवर तसेच बिंदू माधव नगरातील दांपत्यावर अशा एकूण ३ व्यक्तींविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या १८८ कलमाव्दारे कायदेशीररित्या एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर ११ कोपरखैरणे येथील २ व्यक्तींविरुध्द कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या १८८ कलमाव्दारे कायदेशीररित्या एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या घरातच थांबणे अनिवार्य आहे. तरीही बेजबाबदारपणे घराबाहेर पडून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत व्यक्तींविरूध्द अधिक कठोरपणे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या