Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय संरकाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबईतील शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानात पार पडलेल्या या सोहळ्याकडे राज्यातील सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले होते. 

कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या