Ticker

6/recent/ticker-posts

सुरक्षित प्रवासासाठी लोहमार्ग पोलिसांकडून सूचना

 सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती

मुंबई, दादासाहेब येंधे : तब्बल दहा महिन्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू झाल्यानंतर मुंबईने पुन्हा एकदा वेग धरल्याने दिसून येत आहे. सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु झाल्याने मुंबईतील लोकल स्थानकांवर प्रवाशांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. 

मात्र, सुरक्षित वावर आणि इतर सूचनांचे पालन प्रवाशांकडून होताना दिसत नव्हते.  

प्रवाशांना पडलेला कोरोनाचा विसर तसेच वाढती गर्दी लक्षात घेता सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करा, गर्दी करू नका अशा सूचना देण्यात येत आहेत. 


हेेेड कॉन्स्टेबल मोहिते  तसेच इतर पोलीस
सहकारी प्रवाशांना मार्गदर्शन करताना




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या