विंटेज कारचे संचलन
दादासाहेब येंधे :
मॅकलॅरेन, फेरारी, रोल्स रॉईस, बेंटली, एल्विस, डॉज, ब्युइक, कॅडीलेक, फोर्ड, हडसन यासारख्या जुन्या जमान्यातील आकर्षक, नामवंत मोटारी आणि ट्रॅम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन, रॉयल एनफिल्ड यासारख्या मोटारसायकलींनी प्रजासत्ताक दिनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त, ठाण्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ठाणे व मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक सुरक्षा अभियान राबविण्याच्या निमित्ताने विंटेज आणि सुपर कारचे संचलन आयोजित करण्यात आले होते. एकापेक्षा एक अशा कार पाहून उपस्थितांना भुरळ पडली होती. तसेच काहीजण फोटो काढत होते. तर, काहीजण सेल्फी काढण्यात मग्न होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा