घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा
मुंबई : तांडव ही वेब सिरीजमधील हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे यासंदर्भात लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.
जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत मिळावी यासाठी या पथकाने बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा