ऐरोली व नेरुळ येथील महापालिका रुग्णालयातील मेडिकल व आयसीयू वॉर्डचे लोकार्पण तसेच
प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेचा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयाच्या बरीच वर्ष पूर्ण क्षमतेने वापरात नसलेल्या 300 बेड्स क्षमतेच्या इमारतींमध्ये आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुढाकार घेत मेडीकल व आयसीयू वॉर्ड्स सुरु करून आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत कोव्हीडच्या जास्त प्रादुर्भावाच्या काळातही महानगरपालिकेने कोव्हीड रोखण्यासाठी अतिशय चांगले काम केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांनी महानगरपालिकेच्या वतीने मेडीकल कॉलेज सुरु करण्याची प्रक्रीया कार्यान्वित करावी. त्यासाठी शासकीय पातळीवरील आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय व नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय याठिकाणी पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र 15-15 बेड्सच्या मेडिकल वॉर्डसचे तसेच 10 बेड्सच्या आयसीयू वॉर्डच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या समवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, विधानपरिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले व इतर मान्यवर उपस्थित होते.
"प्रिस्क्रिप्शन फ्री" योजनेचा शुभारंभ
याप्रसंगी मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते "प्रिस्क्रिप्शन फ्री" योजनेचा शुभारंभ संपन्न झाला. या योजनेअंतर्गत 1 फेब्रुवारी 2021 पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना डॉक्टरांकडून औषध चिठ्ठी (Prescription) देण्यात येणार नसून सर्व प्रकारची औषधे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विनामूल्य दिली जाणार आहेत. ही प्रिस्क्रिप्शन फ्री योजना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब असल्याचे ना. श्री. एकनाथ शिंदे विशेषत्वाने सांगितले. त्यांच्या शुभहस्ते रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सध्या महानगरपालिका रुग्णालयात काही अंशी औषधे मोफत दिली जातात आणि काही औषधांची तांत्रीक कारणास्तव उपलब्धता नसेल तर ती बाहेरून आणावी लागतात. मात्र 1 फेब्रुवारी 2021 पासून महानगरपालिका रुग्णालयातील आंतररुग्ण व बाह्यरुग्ण अशा दोन्ही सेवांमधील रुग्णांना सर्व प्रकारची 100 टक्के औषधे महानगरपालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नेरुळ व ऐरोली येथील इमारतींची रचना 300 बेड्सच्या दृष्टीने करण्यात आलेली असून ही दोन्ही रुग्णालये संपूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत कार्यरत असण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यापुढील टप्प्यात या दोन्ही रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्जरी, अस्थिरोग व नेत्रचिकीत्सा यांच्या आंतररुग्ण सुविधा सुरु करण्याचे नियोजन आहे.

प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा