Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबई महानगरपालिकेत पत्रकार दिन साजरा

 नवी मुंबई महानगरपालिकेत पत्रकार दिन साजरा 

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन उपस्थित होते.

याप्रसंगी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी पत्रकार हा लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असून नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध उपक्रम, सुविधा, प्रकल्प, कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांचे नेहमीच चांगले सहकार्य मिळते त्याबद्दल आभार मानले. या प्रसंगी पत्रकार कक्षासाठी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता तत्परतेने करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबईच्या जडणघडणीच्या सुरुवातीच्या काळातील महत्वपूर्ण पत्रकार स्व्‍.अशोक जालनावाला यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे  महाराष्ट्र शासनाने  जाहीर केलेल्या "माझी वसुंधरा" अभियानाची सामुहिक शपथ सर्वांनी ग्रहण केली.


























प्रेस नोट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या