Ticker

6/recent/ticker-posts

जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे ब्लँकेट वाटप

 गरीब गरजूंना ब्लँकेट वाटप

मुंबई, दादासाहेब येंधे : रात्रीच्या वेळेस  परळ येथील  टाटा रुग्णालय, के एम  रुग्णालय येथे मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या  रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना  उपचारादरम्यान एकच सहारा असतो तो म्हणजे फुटपाथ. सध्याच्या ह्या थंडीच्या दिवसात थंडीमुळे उघड्यावर झोपणे त्यांना नकोसे झाले आहे. नेमके हेच हेरून जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या वतीने  फुटपाथवरील  गरजू  लहांन मुले , वयोवृद्ध यांना  ब्लॅंकेट आणि स्वेटरचे  वाटप करण्यात आले. 

तदप्रसंगी जीवन प्रबोधिनी  ट्रस्टचे संस्थापक  श्री सत्यवान नर, अध्यक्ष  अमित पवार,  सरचिटणीस हेमंत मकवाना,  खजिनदार  श्रेयस घाटकर, सन्माननीय  सदस्य गणेश क्षीरसागर, गणेश पार्टे, जैनुल महात,  अविनाश पवार,  आदी वमान्यवर उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या