दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आयोजित ONLINE काव्य वाचन स्पर्धा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आयोजित ONLINE काव्य वाचन स्पर्धा

दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आयोजित ONLINE काव्य वाचन स्पर्धा

(फक्त मुंबई, ठाणे, पुणे येथे वास्तव्य असलेल्यांसाठी)

स्पर्धेचा विषय : कविता मराठी बोलीभाषेतील

(महाराष्ट्रात सध्या बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेत  कविता असावी)

कविमित्रांनो नमस्कार, काव्यलेखन ही आदिम कला आहे. कवितेशिवाय मानवी आयुष्य असूच शकत नाही. माणूस जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्युपर्यंत गायलं जाणार गाणं म्हणजे कविता. जगातला कुठलाही धर्म असो त्यांच्या त्यांच्या ईश्वराची आराधना करताना म्हटली जाणारी प्रार्थना म्हणजे कविताच. कितीही टाळलं तरी कवितेशी किंबहुना जात-पात जपणाऱ्या बोलीभाषेतल्या गण्याशी येतोच. त्यातून अस्मिता आणि स्वओळख अभिमानाने जपली जाते. त्यामुळे दासावा च्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला  विषयाचे बंधन आहे मात्र प्रदेशिकता, लिंग, वयाचे बंधन नाही. 

(१) या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे या शहरात वास्तव्यास असलेले कुणीही कवी/कवियत्री सहभागी होऊ शकेल.(निवासी पुरावा लागेल)

(२) कवीता स्वलिखित असावी.

(३) स्पर्धकांनी व्हिडीओ सोबत कविता टाईप किंवा लिहून पाठवावी.

(४) व्हिडीओ करताना मोबाईल आडवा धरून शूट करावे. 

(५) आपण कविता पाठवल्यानंतर dadar sarvajanik vachanalya Dasava या फेसबुक पेजवर अपलोड करून त्याची लिंक पाठवली जाईल. 

(६) व्हिडीओ ४ मिनिटांपेक्षा जास्त नसावा. प्रत्येकाने स्वतःच्या घरात पुरेशा उजेडात स्पष्ट आवाज ऐकायला येईल असा व्हिडीओ काढावा.

(७) स्पर्धकांनी काव्यवाचन करताना अगोदर आपले नाव, गाव, मोबाईल नं, कविता स्वलिखित आहे व आयोजक संस्थेचे नाव हे सांगावे. 

(८) आपल्या कवितेला मिळालेले लाईक, व्हीव्ह, कमेंट, कविता सादरीकरण, कवितेचा आशय या गोष्टी पाहून परीक्षण करून  मूल्यांकन देण्यात येईल, यावेळी श्रोत्यांची आवड म्हणून पारितोषिकासाठी प्राधान्य देण्यात येईल.

(९) सहभागी प्रत्येक स्पर्धकांना दासावाच्या वतीने आणि २७ फेब्रूवारी कुसुमाग्रज जन्मदिनी "मराठी भाषा दिवस" निमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई व मराठी विचारधारा प्रतिष्ठान या संस्थाच्या वतीने रोख पारितोषिक आणि ई प्रमाणपत्र देण्यात येईल.

परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

(१०) निकाल १० फेब्रुवारी रोजी कळविण्यात येईल.

व्हिडीओ खालील व्हाट्सअप मोबाईल नं. 9869274087 (सकाळी १० ते ४ वा) किंवा info@dasava.org यावर  पाठवावा.

(११) व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख २३ जानेवारी सायंकाळी ५ वा पर्यंत त्यानंतर कुणीही संपर्क साधू नये, निकाल मोबाईलवर कळविण्यात येईल.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज