Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस हवालदार ते पोलीस अधिकारी पदाची उतुंग कामगिरी

नायगांव दादर विभागात राहणारे श्री दुर्गेश हरिश्चंद्र साळुंखे  हे त्याचे मामा श्री मंगेश म्हैसधुणे ह्यांच्या चप्पल स्टॉल वर बसून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडील मिल कामगार असल्यामुळे घरची परिस्थिती बिकट होती. मामा चा आधार घेऊन पोलीस भरती ला उभे राहुन  पोलीस कॉन्स्टेबल झाले. नंतर खाते अंतर्गत पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले. आता सध्या अंधेरी डी. एन. नगर पोलीस ठाणे येथे  ए. टी. सी विभाग प्रमुख म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गनमे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वीरित्या कामकाज केले आहे. 

त्याचाच सन्मान म्हणून निरीक्षक दुर्गेश हरिश्चंद्र साळुंखे व त्यांच्या पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत नुकतेच त्यांना  पोलीस आयुक्त मुंबई श्री. परमवीर सिंग साहेब आणि श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब, (कायदा व सुव्यवस्था, मुंबई) यांनी बक्षीस प्रदान करून सन्मानित केले. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या