मुंबई : दरवर्षी थर्टी फर्स्टनिमित्ताने फटाक्यांच्या आतषबाजीत गजबजणाऱ्या समुद्रकिनारी, कोरोनामुळे लागू केलेल्या नाईट कर्फ्युमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. नाकाबंदी, गस्त तसेच ड्रोनद्वारे मुंबई पोलीस सर्व हालाचालींवर लक्ष ठेवून होते.
मुंबईत थर्टी फर्स्टनिमित्त पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस प्रत्येक घडामोडींवर मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेऊन होते. गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करून घरी पाठवले. रात्री ११ नंतर येथे शुकशुकाट पहावयास मिळाला.



0 टिप्पण्या