नाटकाचा पडदा पुन्हा उघडला
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या (covid-19) काळामध्ये मराठी नाटयसृष्टीला अर्धविराम मिळाला होता. पुनश्च हरिओम होत असताना मनोरंजन क्षेत्र अनलॉक झाले तरी मनोरंजन क्षेत्राचा अविभाज्य घटक असलेल्या मुंबई नाट्यनगरीला अनलॉक व्हायला मात्र विलंब लागत होता. अखेर रविवारी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह मध्ये 'इशारों इशारों में' या नाटकाने मुंबईच्या व्यवसायिक नाटकांचा प्रवाह पुन्हा खुला केला. या नाटकाला गॅलरीही खुली करावी लागली. नाटकाला लाभलेल्या या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा नाट्य जाणिवांचा जिवंत अनुभव घेत असल्याचे या नाटकाच्या कलाकारांनी आवर्जून सांगितले.
0 टिप्पण्या