Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया!

 लाखो लिटर पाणी वाया!

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे त्यांचे गळतीचे प्रमाण वाढले आहे. अनेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन असल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीमध्येही अडथळे येतात. माहीम येथे अरुण कुमार वैद्य रोड खालून जाणाऱ्या जलवाहिनी मध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आले होते. पाऊस नसतानाही अचानक रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांचीही मोठी तारांबळ उडाली होती. रस्त्याची एक बाजू पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे गाड्यांचा वेगही मंदावला होता. या घटनेमुळे दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी, लोअर परळ, वरळी जनता कॉलनी, आदर्श नगर आदी भागात शनिवारी पाणी आले नाही. ही जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

सदर घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या जलअभियंता विभागाने तातडीने जलवाहिनी मधून होणारा पाणीपुरवठा बंद केला. जलवाहिनी मधून पाण्याची गळती नेमकी कुठून झाली याचा शोध सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या