अबोध विनोद कुमार शर्मा उर्फ रोहित वय ३० वर्षे, नासिर अली बाबरअली मुल्ला वय २९ वर्षे, तसेच मुस्ताक अली वाजीद यांनी नमूद गुन्ह्यातील फिर्यादी हे ०४ नोव्हेंबर २०२० रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, जोगेश्वरी पश्चिम येथे बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करण्याकरिता गेले होते. त्यावेळी वरील तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडे कागदांचे बंडल देऊन, पैसे दिल्याचे भासवून फिर्यादी यांची एकूण ७० हजार रुपयांची हातचलाखीने फसवणूक केली होती.
नमूद गुन्ह्याचा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर, पोलीस निरीक्षक गुन्हे रघुनाथ कदम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत. व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहक्र. ३२१९६/ दयानंद साटम. पोहक्र ३२२३४/लक्ष्मण बागवे. पोनाक्र. ०४.०९३३ /विनोद माने. पोशिक्र. ०७.०३४२/किरण बारसिंग. पोशिक्र. ०८.०८६३/ उमेश सोयंके. पोशिक्र. 09.0352/कमरुलहक शेख. पोशिक्र. ०९.३५८२ /मनिष सकपाळ यांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज नुसार व तांत्रिकदृष्ट्या तपास करून नमूद गुन्ह्यातील खालील नमूद आरोपींना विरार पूर्व परिसरात अथक परिश्रमाने शोध घेऊन शिताफीने पकडून अटक करण्यात आलेली आहे.
१) अबोध विनोद कुमार शर्मा उर्फ रोहित वय ३० वर्षे
२) नासिर अली बाबरअली मुल्ला वय २९ वर्षे
३) मुस्ताक अली वाजीद अली सय्यद उर्फ गुड्डू वय ३० वर्षे
यातील अटक आरोपींना मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे अशा प्रकारचे आणखी गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे. तरी आरोपींचा ताबा आवश्यक असल्यास माननीय महानगर दंडाधिकारी, रेल्वे मोबाईल न्यायालय, अंधेरी पूर्व, मुंबई यांना विनंती करावी. अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली आहे.



0 टिप्पण्या