अवघ्या ०२ तासात पळवून नेलेल्या १ वर्षाच्या बालिकेस महिला आरोपीकडून सुखरुप ताब्यात घेतले
चार आरोपिंना ठोकल्या बेड्या
मुंबई, दादासाहेब येंधे : चारकोप पोलीस ठाणे येथे श्रीमती सुनिता राजू गुरव, वय ३० वर्षे, या घरकाम करणाऱ्या, राहणार अंबूजवाडी, कारगील, गल्ली क. ४, मालवणी, मालाड (प), मुंबई यांनी पोलीस ठाणेत तक्रार दाखल केली की, दिनांक ०२/११/२०२० रोजी रात्रौ २१.०० वा. भूमी पार्क फेस ५ च्या सोसायटीच्या ऑफिसबाहेर फुटपाथवर पती व मुलांसह झोपले होते. दिनांक ०३/११/२०२० रोजी ०३.३० वा. दरम्यान सुुनीता यांना जाग आली तेव्हा त्यांची ०१ वर्षाची बबीता ही मुलगी दिसून आली नाही म्हणून सुनीता व
तिचा पतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु त्यांची मुलगी बबीता ही मिळून आली नाही.
सुनिता राजू गुरव हिची मुलगी बबीता, वय ०१ वर्षे हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. अशी त्यांची खात्री झाल्याने त्यांनी ११.०० वा. चारकोप पोलीस ठाणे येथे येवून फिर्याद केली. पोउनि भारत ढेंबरे यांनी सदरची फिर्याद नोंद करुन गु.र.क. ८७५/ २०२०, कलम ३६३ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा व संवेदनशील असल्याने तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंतर्गत तपासाकरिता ०३ पथकांची नेमणूक करण्यात आली. त्या पथकांमार्फत आसपासच्या परिसरात बळीत मुलीचा कसून शोध घेण्यात आला.पळवून नेलेली मुलगी ही अत्यंत लहान असल्याने व ती बोलू शकत नसल्याने सदरचा गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचा होता. म्हणून घटनास्थळावरील व लगतच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. त्यांचा तांत्रिक तपास केला व गुप्त बातमीदाराच्या मदतीने अवघ्या ०२ तासात सदर अपहृत ९ वर्षाच्या बालिकेस अंधेरी परिसरातून महिला आरोपीकडून सुखरुप ताब्यात घेतले व या गुन्ह्यातील चारही आरोपींना ताब्यात घेतले.
मा. अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, श्री दिलीप सावंत यांचे आदेशानुसार पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-११, श्री विशाल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चारकोप पोलीस ठाणे श्री विठ्ठल शिंदे, पोनि लांगी, सपोनि वाघमारे, पोउनि ढेंबरे व स्टाफ यांचे विशेष पथक तयार केले होते.
अटक आरोपींची नावे :--
१) सचिन महादेव येलवे, ४० वर्षे
२) सुप्रिया सचिन येलवे, ३५ वर्षे
३) रश्मी रत्नाकर नायक उर्फ रश्मी राजू पवार, २९ वर्षे आणि
४) राजू मोहन पवार, ३६ वर्षे


0 टिप्पण्या